Nanded Crime : साडेदहा लाखांची बॅग पळवणारा चोरटा जेरबंद

नांदेड शहरात स्‍थानिक गुन्‍हे शाखेची कारवाई
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

नांदेड : शहरातील जुना मोंढा परिसरात खंजरचा धाक दाखवून साडेदहा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळवणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील मुख्य आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. महेश आनंदराव शिंदे (वय २२ वर्ष, व्यवसाय-बेकार, रा. शंकर नगर, वसरणी, नांदेड) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. तो गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत फरार होता.

गत ३० मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास जालना येथील व्यापारी सोहनलाल मोतीलालजी परमार यांचे जुना मोंढा येथील 'मा. आरबुंदा ट्रेडिंग' नावाचे आडत दुकान बंद करण्याची तयारी सुरू होती.

Crime News
Washim Crime : मंगरुळपीर हादरले! १९ लाखांचा गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

दरम्यान, तीन अज्ञात दरोडेखोरांनी अचानक ऑफिसमध्ये प्रवेश केला. त्यांनी तेथे काम करणारे कर्मचारी शिवहार पतरावाळे यांना खंजरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आणि ऑफिसमधील १० लाख ५० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग जबरीने लुटून पोबारा केला होता. या खळबळजनक घटनेप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी 'ऑपरेशन फ्लश आऊट' मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तैनात केले होते.

Crime News
Sambhajinagar Crime : जुगारासाठी दुकाने फोडणाऱ्या कुख्यात दुल्हनला ठोकल्या बेड्या

१५ जून रोजी पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे व त्यांचे पथक वजीराबाद हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. जुना मोंढा येथील दरोड्याचा मुख्य सूत्रधार महेश शिंदे हा देगलूर नाका परिसरातील हैदर गार्डन फंक्शन हॉलसमोर थांबल्याची पक्की माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

​आरोपी वजिराबाद पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे वेढा घालून संशयित महेश शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदारांसह सदर दरोडा टाकल्याची कबुली दिली. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी वजीराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही धडक कारवाई पोहेकॉ रितेश कुलथे, अझरोद्दीन शेख, अनिल बिरादार, ज्ञानेश्वर कलंदर, संजय राठोड आणि सायबर सेलचे दीपक ओढणे, राजेंद्र सिटीकर यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news