Dombivli News | 'दै. पुढारी' इम्पॅक्ट: अखेर डोंबिवलीतील धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचे उघडले टाळे

उबाठासह स्थानिक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात, या मथळ्याखाली 'दै. पुढारी'ने १४ ऑगस्टच्या अंकात सचित्र वृत्त प्रसारित केले होते
 Dombivli Anand Dighe Garden Reopening
Dombivli Anand Dighe Garden ReopeningPudhari
Published on
Updated on

Dombivli Anand Dighe Garden Reopening

डोंबिवली :
डोंबिवलीच्या धर्मवीर आनंद दिघे उद्यानाला पुन्हा टाळे : निवासी विभागातील अबालवृद्ध वैतागले : उबाठासह स्थानिक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात, या मथळ्याखाली 'दै. पुढारी'ने १४ ऑगस्टच्या अंकात सचित्र वृत्त प्रसारित केले होते. पुढारीकडून सातत्याने लावून धरलेल्या पाठपुराव्याचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आक्रमक आंदोलनाच्या इशाऱ्याचा अखेर मोठा इम्पॅक्ट झाला आहे.

डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेले प्रवेशद्वार अखेर बुधवारी धर्मवीर आनंद दिघे यांच्या २६ व्या पुण्यतिथीच्या दिवशीच उघडण्यात आले आहे.

 Dombivli Anand Dighe Garden Reopening
Kalyan Dombivli Municipal News: KDMC उद्यान विभागाच्या खर्चावर संशय; तीन वर्षांत २.३९ कोटी, तर एका वर्षात २५ कोटींचा खर्च

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अखत्यारीतील हे महत्त्वाचे उद्यान मागील दीड वर्षांपासून नियमित सकाळ संध्याकाळ उघडले जात नव्हते. याचे मुख्य कारण म्हणजे या उद्यानावर असलेल्या कंत्राटी सुरक्षा रक्षक ठेकेदाराचा ठेका संपला होता आणि नवीन ठेकेदाराची नेमणूक महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली नव्हती. सुरक्षा रक्षकच नसल्याने उद्यानाला कायमस्वरूपी टाळे लागले होते.

यामुळे येथे नियमितपणे फिरायला येणारे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिला वर्गाचा मोठा हिरमोड झाला होता. उद्यानातील ओपन जिम, लहान मुलांची खेळणी, जॉगिंग ट्रॅक आणि लहान मोठ्या झाडांची देखभाल देखील पूर्णपणे थांबली होती आणि उद्यानात झाडी झुडपे वाढून दुरवस्था झाली होती.

 Dombivli Anand Dighe Garden Reopening
Dombivli Crime News: डोंबिवलीत उच्चभ्रू लोकवस्तीत चालणारे छुपे रॅकेट उघड

या संदर्भात स्थानिक रहिवाशांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एमआयडीसी शाखेने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, उद्यान विभाग आणि लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊन देखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नव्हती. अखेर या उदासीनतेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एमआयडीसी शाखेने धर्मवीर आनंद दिघे यांच्या २६ व्या पुण्यतिथी निमित्त बुधवारी याच उद्यानाच्या प्रवेशद्वारावर धर्मवीर आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहून आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला होता. या संदर्भातील सविस्तर वृत्त दैनिक पुढारीने यापूर्वीच प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

सुरक्षा रक्षकाची नेमणूक

पुढारीच्या वृत्ताची आणि शिवसेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेत केडीएमसी प्रशासनाने अखेर तत्परतेने कार्यवाही केली आहे. बुधवारी सकाळीच महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचा एक सुरक्षा रक्षक तातडीने नेमून हे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. इतकेच नाही तर उद्यानात वाढलेली झाडी झुडपे काढण्याचे आणि संपूर्ण परिसराची साफसफाई करण्याचे काम देखील युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

 Dombivli Anand Dighe Garden Reopening
Dombivli Marriage Fraud: शारीरिक व्यंग लपवून तरूणाने केले लग्न; ४० तोळे सोने परत न केल्याने सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा

दैनिक पुढारीचे आभार !

उद्यान पुन्हा उघडल्याने, सुरक्षा रक्षक नेमल्याने आणि साफसफाईचे काम सुरू झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे बुधवारी होणारे आंदोलन हे धर्मवीर आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहून स्थगित करण्यात आल्याचे माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, माजी विभागप्रमुख राजू नलावडे, उपविभाग प्रमुख मंदार स्वर्गे आणि शाखाप्रमुख सागर पाटील यांनी सांगितले. या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल उपस्थित सर्वांनी केडीएमसी प्रशासनासह आणि दैनिक पुढारीचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news