Dombivli Crime News: डोंबिवलीत उच्चभ्रू लोकवस्तीत चालणारे छुपे रॅकेट उघड

सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीत देहविक्रीचा बाजार
Police Raid
Police RaidPudhari
Published on
Updated on

डोंबिवली: डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एका निवासी संकुलात चोरी/छुपे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकीकडे पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक केलेल्या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

तर दुसरीकडे जिथे लहान मुले, महिला आणि कुटुंबे राहतात, त्या इमारतीत अशा अनैतिक धंद्याचे रॅकेट सुरू असल्याचे छाप्या दरम्यान उघडकीस आल्यानंतर रहिवाशांमध्ये संतापासह असुरक्षिततेची भावना निर्माण झाली.

Police Raid
Bhiwandi crime news: टोमणे मारणाऱ्यांना हटकले; टोळक्याने केली वृद्धाची हत्या

एका जागरूक रहिवाशाला या गोरखधंद्याची कुणकुण लागली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीची पडताळणी करून त्याने ही माहिती तातडीने पोलिसांना दिली. दक्ष रहिवाशाच्या सतर्कतेमुळेच या काळ्या धंद्याचा पर्दाफाश होऊ शकला.

परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास देसले पाड्यातील निवासी संकुलात असलेल्या एका फ्लॅटवर छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच या रॅकेटमधील साऱ्यांची एकच धावपळ उडाली.

Police Raid
Dombivli Marriage Fraud: शारीरिक व्यंग लपवून तरूणाने केले लग्न; ४० तोळे सोने परत न केल्याने सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा

या कारवाईत पोलिसांनी दोघा दलालांना बेड्या ठोकण्यात आल्या. या कारवाईत दोन्ही दलालांच्या ताब्यातून मोबाईल फोन, काही रोख रक्कम आणि आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या.

या नरकयातनेत अडकलेल्या पाच महिलांची सुटका केली असून त्यांना समुपदेशनासाठी पाठविण्यात आले आहे. या ३० ते ४० वयोगटातील असलेल्या या महिला विक्रोळी, दिवा, ऐरोली, कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुसंस्कृत डोंबिवलीत अशा प्रकारे निवासी संकुलांच्या आड वेश्या व्यवसाय फोफावत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाड्याने फ्लॅट घेऊन असे व्यवसाय चालविणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.

डोंबिवलीतील या रॅकेटचे धागे/दोरे आणखी कुठपर्यंत पसरले आहेत, याचा छडा लावण्यासाठी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मनीषा वर्पे आणि त्यांच्या पथकाने तपासचक्रांना वेग दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news