शेतकऱ्यासाठी मोलभाव कधी करू नका; चिमुकलीच्या प्रश्नावर अमोल कोल्हेंचे शानदार उत्तर

Amol Ramsing Kolhe
Amol Ramsing Kolhe

कल्याण : पुढारी ऑनलाईन डेस्क : कल्याणच्या सेक्रेड हार्ट शाळेतील ४थी मधील लहान मुलगी अन्नदा हिने शेतकरी वर्ग यांच्या समस्या कशा पध्दतीने सोडवाल? असा प्रश्न सामान्यांच्या वतीने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना विचारला. या प्रश्नाचे समर्पक उत्तर कोल्हे यांनी दिले आहे.

या भेटीदरम्यान अन्नदाने खासदार अमोल कोल्हे यांचे पुन्हा एकदा खासदार झाल्याने आभार मानले. यानंतर तिने जसे शिवरायांनी शेतकऱ्यासाठी स्वराज्य निर्माण केलं तसे तुम्ही शेतकऱ्यासाठी काय कराल? असा प्रश्न उपस्थित केला. यावर शेतकरी टॅक्स भरत नाही असे म्हटलं जाते, परंतु, शेतकऱी जे काही खरेदी करतो त्या प्रत्येक गोष्टीवर टॅक्स भरतो. शेतकरी जो माल पिकवतो त्याला हमीभाव पाहिजे असतो. मालाची आयात- निर्यात धोरण स्पष्ट असली पाहिजेत. ते लोकसभेत ठरतं त्यासाठी मी प्रयत्न करेन. शेतकऱ्यांना लागणारी औंजारे महाग असतात. शेतीचा व्यवसाय निसर्गावर अवलंबून असतो. चांगलं पिक असूनही कधी-कधी भाव मिळत नाही. स्वस्तात कांदा हवा असतो. मात्र, शेकऱ्याला कांदा पिकवण्यासाठी खूपच मेहनत ध्यावी लागते. असे ते यावेळी म्हणाले.

जो कांदा घरात येतो तो, ३२ वेळा शेतकऱ्याच्या हातातून जात असतो. म्हणजे, या मागे ३२ लोकांचे कष्ट असतात. मॉलमध्ये लोक गेले की, कधीच वस्तुची किमंत कमी करा म्हणत नसतात. मात्र, शेतकऱ्याकडून माल विकत घ्यायचा म्हटलं की, काय कमी होत का? ते पाहतात. यामुळे शेतकऱ्याच्या कष्टाचे चिज होत नाही. आता एक करा की, शेतकऱ्यांच्या मालाचे कधी मोलभाव करू नका. कारण त्याचे खूपच कष्ट असतात, ही गोष्ट शंभर टक्के पुर्ण करणार. असे म्हणत अमोल कोल्हे हे 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' म्हणून बोलणं संपवतात.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news