जालना : दोन बांधकाम मजुरांचा ट्रॅक्‍टर खाली पडून मृत्‍यू

file photo
file photo

शहागड ; पुढारी वृत्‍तसेवा अंबड तालुक्‍यातील शहागड जवळील गोंदी-पाथरवाला-शहागड राज्‍य महामार्गावर (गुरूवार) सकाळी बांधकाम मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॉक्‍टर मधून पडून दोन मजुरांचा मृत्‍यू झाला. ट्रॅक्‍टर गोंदी रोडवर शहागड येथील महाराष्‍ट्र विद्युतच्या सब स्‍टेशन समोर आला असता या ठिकाणी असलेल्‍या खड्ड्यात ट्रॅक्‍टर आदळला. या धक्‍क्याने ट्रॉलीमध्ये बसलेले मजुर ट्रॅक्‍टर आणि ट्रॉलीच्या मागच्या टायरमध्ये पडले. यात एका मजुराचा जागीच मृत्‍यू झाला. तर दुसऱ्या मजुराचा छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रूग्‍णालयात उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला.

मृत दिलीप चुरोंजीलाल कलमे (वय 22 वर्ष) हा बांधकाम मजूर रा. रामटेक शिराली जि. हरदा रा. मध्यप्रदेश ह.मु संजय नगर गेवराई जि.बीड याला अपघात होताच त्‍याला प्रथम शहागड येथील खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले होते. परंतु या ठिकाणी न घेता सरकारी दवाखान्यात पाठण्यात आले. शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यानंतर डॉ. मोहम्मद साद वैद्यकीय अधिकारी यांनी चुरोंचीलाल याला तपासून मृत घोषित केले. तर दुसरा जखमी करण रा. रामटेक शिराली जि. हरदा रा. मध्यप्रदेश ह.मु संजय नगर ता. गेवराई जि.बीड याला शहागड येथील खाजगी रुग्णालयात प्रथम उपचार करून रुग्णवाहिकेने छत्रपती संभाजी नगर येथील एमजीएम दवाखान्यात हलवण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्याचाही मृत्‍यू झाला. दोघांचेही शवविच्छेदन होऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. गेवराई येथील ट्रॅक्टर मजूर घेऊन पाथरवाला येथे बांधकाम कामासाठी जात होते. दोन्ही मजुर ट्रॅक्टर खाली आल्याने त्यांच्या पोटावर मानेवर डोक्याला मार लागला होता.

या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्‍हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार योगेश दाभाडे हे करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news