NEET-UG 2024| NEET समुपदेशन प्रक्रिया सुरूच राहणार, सुप्रीम कोर्टाचा पुनरुच्चार

NEET-UG 2024| NEET समुपदेशन प्रक्रिया सुरूच राहणार, सुप्रीम कोर्टाचा  पुनरुच्चार

पुढारी ऑनलाईन डेस्क: सर्वोच्च न्यायालयाने NEET-UG 2024 संदर्भातील समुपदेशन  प्रक्रियेला स्थगिती देण्यास पुन्हा नकार दिला आहे. त्यामुळे नीट परीक्षा  समुपदेशन प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचा पुर्नउच्चार  सुप्रीम कोर्टाने आज (दि.२१ जून) केला, या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने NEET-UG 2024 संदर्भा नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) नोटीस जारी केली आहे. सुप्रीम कोर्टाने NEET-UG 2024 संदर्भातील सर्व प्रलंबित याचिकांसह ताज्या याचिकेवरील सुनावणी ८ जुलै रोजी रोजी होणार असल्याचे न्यायालयाने आज सुनावणी दरम्यान स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी UG-NEET परीक्षेसंदर्भात विविध उच्च न्यायालयातील खटले स्वतःकडे वर्ग केले होते, तसेच NEETचे काऊन्सिलिंग सुरू ठेवत उच्च न्यायालयातील खटल्यांच्या कारवाईला स्थगिती दिली होती.

दरम्यान मेघायलयातील विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीला नोटीस पाठवली होती. परीक्षेच्या वेळी ४५ मिनिटं वाया गेल्याची तक्रार या विद्यार्थ्यांनी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांची २३ जूनमध्ये पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे, त्या १५६३ विद्यार्थ्यांमध्ये समावेश करावा, अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे. या ( NEET-UG 2024) याचिकेवर ८ जुलैला सुनावणी होणार आहे.

 NEET-UG 2024| NEETचा वाद काय आहे?

NEET-UG 2024 ही परीक्षा ५ मे रोजी घेण्यात आली आणि ४ जूनला निकाल जाहीर करण्यात आला. हा निकाल नियोजित तारखेच्या दहा दिवस आधीच जाहीर झाला. विशेष म्हणजे ६७ विद्यार्थ्यांना ७२०पैकी ७२० मार्कस मिळाले होते. त्यातून या परीक्षेच्या विरोधात निदर्शने सुरू झाली. दरम्यान गुजरात आणि बिहारमधून पेपर फुटीचे प्रकारही पुढे आले. काही विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुन्हा घेण्याच्या मागणीसाठी कोर्टात धाव घेतली.

या परीक्षेत एकूण १५६३ विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आले होते. ते सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. या विद्यार्थ्यांची आता २३ जूनला नव्याने परीक्षा होणार आहे. या १५६३ विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल ३० जूनला जाहीर होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news