

अंबरनाथ : पॅनल पद्धतीने होणार्या अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे आरक्षण अखेर जाहीर झाले असून, एकूण 29 पॅनल मध्ये 59 नगरसेवकांचे भवितव्य ठरणार आहे. या आरक्षणाचा फायदा दिग्गज माजी नगरसेवकांना झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली 8 ऑक्टोबर रोजी अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील 29 प्रभागांमधील प्रभागनिहाय आरक्षण सोडत विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून पारदर्शक पध्दतीने जाहीर करण्यात आली. एकूण 29 पॅनल मध्ये 28 प्रभाग हे द्विसदस्य पद्धतीचे तर पॅनल क्रमांक 4 हा त्रिसदस्य पद्धतीचा आहे.
या आरक्षण सोडतीनंतर अंबरनाथ मधील बड्या राजकीय पुढार्यांना दिलासा मिळाला आहे. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, मनीषा वाळेकर, माजी उप नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, अब्दुल शेख, प्रदीप पाटील, सदाशिव पाटील, कुणाल भोईर, ज्योत्सना भोईर, रेशमा गुडेकर, उमेश गुंजाळ पंढरीनाथ वारिंगे, अर्चना रसाळ, प्रज्ञा बनसोडे, निखिल वाळेकर, संदीप भराडे, शशांक गायकवाड, उमेश पाटील या दिग्गज पदाधिकार्यांसह नगरसेवक सेफ झोनमध्ये आले आहेत.
प्रभाग निहाय आरक्षण
अनुसूचित जाती -
आठ जागा त्यातील चार जागा महिलांसाठी राखीव
अनुसूचित जमाती -
दोन जागा - एक जागा महिलांसाठी राखीव
नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग -
16 जागा - आठ जागा महिलांसाठी राखीव
सर्वसाधारण प्रवर्ग -
33 जागा - 17 जागा महिलांसाठी राखीव