Mumbai Metro : पुढच्या 4 महिन्यांमध्ये अंबरनाथ-कांजुरमार्ग मेट्रोचे काम सुरू होणार

देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, निवडणूक बंदुकीच्या धाकावर नाही तर विकासाच्या मुद्यावर लढवली जाईल
Devendra Fadnavis
Published on
Updated on

अंबरनाथ : मेट्रो नेटवर्कच्या माध्यमातून आज अंबरनाथ, बदलापूर या ठिकाणी मेट्रो पाच असेल मेट्रो 12 असेल मेट्रो 14 असेल याचा मोठा फायदा आपल्या अंबरनाथला होणार आहे. कारण कांजुरमार्गपासून अंबरनाथपर्यंत मेट्रो 14 होणार आहे. पुढच्या चार महिन्यांमध्ये या मेट्रो 14 चं काम हे सुरू करण्याचा मी निर्णय केलेला आहे, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबरनाथ येथे दिली. ही निवडणूक बंदुकीच्या धाकावर नाही तर विकासाच्या मुद्यावर लढवली जाईल, असे ही फडणवीस यांनी बोलून अंबरनाथमध्ये भाजपा उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर झालेल्या गोळीबाराबाबत इशारा दिला.

Devendra Fadnavis
Mumbai Metro : आचारसंहितेमुळे लोकार्पण रखडले; मेट्रो २ ब आणि ९ आता पुढील वर्षीच!

अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस बोलत होते. आजच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कमी दिवस होते जास्त ठिकाणी जायचं होतं आणि अंबरनाथ आणि बदलापूर दोन पैकी एकाचाच नंबर लागू शकत होता. तर बदलापूरचा नंबर लागला तिथली सभा माझी झाली पण माझी मनापासून इच्छा होती की अंबरनाथला जाता आलं पाहिजे आणि अचानक निवडणूक पुढे ढकलली गेली आणि मला आपल्या सर्वांचं दर्शन घ्यायची संधी त्यामुळे लाभली. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना याच ठिकाणी नमस्कार करतो. आपल्या सर्वांचं दर्शन घेतो. अशी फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. खर म्हणजे अंबरनाथ हे मुंबईचा प्रवेशद्वार देखील आहे आपल्या मध्य रेल्वेची जीवन रेषा इथून जाते आणि एकूणच एक अतिशय जुने शहर म्हणून या शहराकडे पाहिलं जातं विशेषता अतिशय प्राचीन अशा प्रकारच्या या शिव मंदिरामध्ये खरं म्हणजे या ठिकाणीच हे त्या ठिकाणी माझा प्रणाम पोहोचवतो. यानिमित्ताने अंबरनाथला येण्याची संधी तर मिळालीच पण त्यासोबत भाजपचा विकासाचा अजेंडा हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी देखील मला मिळाली, असे फडणवीस म्हणाले.

  • अंबरनाथमध्ये भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाकरता तेजश्रीताईंसारखी एक युवा आणि अतिशय सुशिक्षित अशा प्रकारची उमेदवार दिली आहे. त्या चार्टर्ड अकाउंटंट आहेत. सगळा हिशोब ठेवतील आणि ज्यांचा हिशोब करायचा आहे त्यांचा हिशोब करतील देखील. आणि आता त्यांनी सांगितलेलं आहे पारदर्शी प्रामाणिकतेतून काम करण्याची त्यांची जी मानसिकता आहे. तुम्ही अशा प्रकारच्या मानसिकतेत काम केलं तर त्या व्यक्तीला कधीच कोणी थांबवू शकत नाही. आणि त्या शहरालाही विकासापासून कोणी कधी थांबवू शकत नाही.

  • शहरांमध्ये लोक राहतात शहरांमधल्या लोकांची काय गरज आहे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, पिण्याचे पाणी घनकचर्‍याचे व्यवस्थापन या सगळ्या ज्या गरजा आहेत. अश्याचे नियोजन करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. असे ही फडणवीस म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वन मंत्री गणेश नाईक, आमदार चित्रा वाघ, किसन कथोरे, गुलाबराव करंजुले, माजी आमदार नरेंद्र पवार आदी उपस्थित होते.

Devendra Fadnavis
Mumbai Metro : मेट्रो मार्गिकेवर सेवा विस्कळीत!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news