अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी नकार देणाऱ्या बांधकाम धारकांवर गुन्हा दाखल

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
Published on
Updated on

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा: अनधिकृत बांधकाम असलेली इमारत तोडण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. त्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांसह इतरांवर महापालिकेने विष्णू नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

महापालिकेच्या 'ह ' प्रभागक्षेत्र म्हणजे, डोंबिवली पश्चिम येथील आनंदनगर, नवागाव, ठाकूरवाडी, जुनी डोंबिवली, कुंभारखानपाडा, गणेश घाट रोड, डोंबिवली (पश्चिम) या परिसरातील सुनील नारकर, प्रवीण पंढरीनाथ ठाकूर, विष्णू गुप्ता बांधकाम धारकांवर गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत अनधिकृत इमारतींचे बांधकाम मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप केला जात होता. हा मुद्दा विधानसभेपर्यंत गाजल्याने त्यानंतर अनधिकृत बांधकाम तात्काळ तोडण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले होते.

तत्कालीन 'ह' प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांनी या सूचनेनुसार संबंधित काही इमारतीच्या मालकांना इमारतीचे कागदपत्रे सादर करा असे सांगितले होते. मात्र, २०२१च्या जुलै आणि ऑगस्टमध्ये बांधकाम धारकांनी हे कागदपत्रे सादर केले नसल्याने या सर्व इमारती त्यांनी अनधिकृत बांधकाम असल्याचे घोषित केले. त्यानंतर तत्काळ या इमारती पडण्याचे आदेश दिले. असे असले तरी बांधकाम धारकांनी अद्यापही त्या इमारती पाडलेल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेतर्फे अरुण बसवंत यांनी विष्णू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news