Dobiwali : आमदार रवी चव्हाणांविरुद्ध शिवसेना गुन्हा दाखल करणार | पुढारी

Dobiwali : आमदार रवी चव्हाणांविरुद्ध शिवसेना गुन्हा दाखल करणार

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : आमदार रवींद्र चव्हाण सातत्याने शिवसेनेवर आरोप करत असतात. मात्र, त्यांनी ४७१ कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगून डोंबिवलीकरांची (Dobiwali) फसवणूक करत आहेत. त्यामुळे त्यांनी त्या पैशाचं नेमका काय झालं, याचे पुरावे द्यावे अन्यथा त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती शुक्रवारी दुपारी माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

आमदार रवींद्र चव्हाण यांनी  सातत्याने पत्रकार परिषद घेत चक्क वेंगुर्ले येथील विकास प्रकल्प कल्याण डोंबिवलीतील अधिकारी आणि पत्रकारांना दाखवण्याचा घाट घातला आहे. मात्र १२ वर्ष  स्वतः आमदार असताना आणि ३ वर्ष मंत्री पद हातात असताना वेंगुर्ले येथील विकास प्रकल्प दाखवायची वेळ का येते, असे म्हणत डोंबिवलीतील विकास प्रकल्प कोकण वासियांना दाखवणे गरजेचे होते, असा आरोप यावेळी त्यांनी केला.

इतकेच नव्हे तर खासदार श्रीकांत शिंदे सध्या संसदेत जलवाहतूक ओरकलपाचा निधी केंद्राने रद्द केल्यामुळे तो परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र येथील आमदार केंद्राशी बोलण्यासाठी त्यांना का मदत करत नाहीत, असे सांगत आमदारांना जर विकास निधी हवा असेल तर त्यांनी खासदारांना येऊन भेटावे म्हणजे खासदारांकडून नक्कीच मदत केली जाईल असे सांगितले.

शिवसेनेतर्फे जे बोलतात त्यांच्याकडे आता पद नाही, त्यामुळे कोणत्या अधिकाराने ते बोलतात असा प्रशा आमदारांनी मागे विचारला होता. मात्र, आम्ही एक माजी नगरसेवक म्हणून बोलत असलो तरी मूळात एक डोंबिवलीकर नागरिक म्हणून बोलत असल्याचे सांगत काही दिवसांनी ज्या रस्त्याचे भूमिपूजन आमदारांनी केले त्या चौकात नागरिकच आमदारांना प्रश्न विचारतील, असा आरोप यावेळी म्हात्रे यांनी केला. तर आमदार आधुनिक शुक्राचार्य असल्याचे सांगत काम करणाऱ्या खासदारांच्या मागेच ते का लागतात, असा आरोप राजेश कदम यांनी केला.

हे वाचलंत का? 

Back to top button