Maharashtra Politics : ठाकरेंची सेना पुन्हा फुटणार ; खा. नरेश म्हस्के यांचा दावा

Maharashtra Politics
Maharashtra Politics

पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुटणार असल्याचा दावा ठाणे मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी आज (दि.८) माध्यमांशी बोलताना केला.

ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधला

नरेश म्हस्के म्‍हणाले की, "अनेक नगरसेवक, लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या मुळ प्रवाहात येवू पाहत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क करुन निर्णय घेणार आहेत. त्याचबरोबर ठाकरे यांच्या सोबतचे दोन खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक राहण्यासाठी आमच्या संपर्कात आहेत,  सहा खासदार नरेंद्र मोदी यांना पाठींबा देणार आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. आपल्या मतदारसंघात काम झाली पाहिजेत, विकास झाला पाहिजे यासाठी त्यांना नरेंद्र मोदी यांना पाठींबा द्यायचा आहे. त्यांनी असेही सांगितले आहे की, त्यांना उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका मान्य नाही." ( Maharashtra Politics)

संजय राऊतांना मानसोपचाराची गरज 

गेले दोन वर्षे झाले संजय राऊत राज्‍य सरकार पडणार, असा दावा करत आहेत. राऊत दररोज सकाळी जागे हाेतात.  शरद पवार यांचा त्‍यांना फोन येतो. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्‍या विराेधात बोलतात, ते पे रोलवर आहेत. मानसिक रुग्णाच एक लक्षण असत जे होणार नाही ते झाल आहे अस वाटत असते. हे लक्षण संजय राऊत यांच्‍यामध्‍ये दिसत आहे. त्यांना मानसोपचाराची गरज आहे, अशी बाेचरी टीकाही त्‍यांनी केली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news