ठाणे : गुरुद्वाराची २० फुटाची भिंत कोसळली

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिकेच्या पंपिंग स्टेशन येथे पाणीपुरवठा ओव्हरफ्लो झाल्याने गुरुद्वाराच्या आवारात असलेली सुमारे १८ ते २० फुटांची सुरक्षा भिंत क्रिटिकेअर लाइफलाइन हॉस्पिटलच्या आवारात पडल्याची घटना मंगळवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. याच दरम्यान पाणी टाकी पडल्याची अफवा पसरली होती. घोडबंदर रोड, डोंगरीपाडा,सर्व्हिस रोड येथील एचडीएफसी बँक येथे टीएमसीचे पंपिंग स्टेशन आहे.
त्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरू असताना ओव्हरफ्लो झाल्यामुळे गुरुद्वाराच्या आवारात असलेली सुमारे १८ ते २० फुटाची सुरक्षा भिंत क्रिटिकेअर लाइफलाइन हॉस्पिटलच्या आवारात पडल्याची तक्रार ठामपा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेला प्राप्त झाली.
त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कोणालाही दुखापत झाली नसल्याची बाब पुढे आली. याचदरम्यान पाणी टाकी फुटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र घटनास्थळी पाहणी केल्यावर पंपिंग स्टेशन येथे पाणीपुरवठा ओव्हरफ्लो झाल्याचे निदर्शनास आल्याचे आपत्ती कक्षेने सांगितले.
हेही वाचलंत का?
- parag agrawal : मुंबई ते ट्विटर… ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांचा असा आहे प्रवास
- गोवा राज्याला ड्रग्जमुक्त करणे माझे ध्येय : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
- CEO Dilip Swamy : लसीचे दोन डोस घेतलेल्या कर्मचार्यांनाच कामावर बोलाविणार
- Siddheshwar Sugar Factory च्या निवडणुकीसाठी 136 जणांनी नेले अर्ज