Chemical Factory fire : बदलापूर एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग; एकाचा मृत्यू | पुढारी

Chemical Factory fire : बदलापूर एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग; एकाचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर एमआयडीसीतील एका कंपनीत आज (दि.१८) पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी स्फोट होऊन भीषण आग लागली. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

बदलापूर खरवई एमआयडीसीमध्ये असलेल्या वीकी केमिकल कंपनीत मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. कंपनीत चार ते पाच मोठे स्फोट झाले. या स्फोटाचे धक्के चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत जाणवले. या स्फोटात एका मजुराचा मृत्यू झाला तर चार मजूर गंभीर जखमी झाले. या कंपनीच्या बाहेर दोन टेम्पो उभे होते. आधी या टेम्पोमध्ये केमिकलने आग लागली आणि नंतर आग कंपनीत पसरल्याचे कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. बदलापूर अंबरनाथ, अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आता अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

हेही वाचा : 

Back to top button