Thane crime news : कल्याण येथील लॉजमध्ये आढळला महिलेचा मृतदेह | पुढारी

Thane crime news : कल्याण येथील लॉजमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याणात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाला दहा दिवस उलटत नाही. तोच कल्याण पश्चिमेकडील स्टेशन परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. ज्योती तोरडमल असे या मृत महिलेचे नाव असून ती शनिवारी (दि.9) एका व्यक्तीसोबत सदर लॉजमध्ये आली होती. या महिलेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. Thane crime news

कल्याण पश्चिमेकडे स्टेशन परिसरात एक लॉज आहे. तेथील एका रूममध्ये ज्योती तोरडमल या महिलेचा मृतदेह आढळून आला. घाटकोपरमध्ये राहणारी ही महिला भूपेंद्र गिरी नावाच्या एका व्यक्तीसोबत शनिवारी दुपारच्या सुमारास लॉजमध्ये आली होती. रविवारी सकाळी बराच वेळ झाला, मात्र दरवाजा उघडत नसल्याने लॉजमधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला. तेव्हा ज्योतीचा मृतदेह बेडवर पडलेला आढळून आला. लॉजच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ ही माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर या महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवून दिला. Thane crime news

नाक-तोंड दाबून श्वास कोंडून या महिलेची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येते. पोलिसांनी या संदर्भात दप्तरी नोंद केली आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती सोबत आलेला भूपेंद्र गिरी हा शनिवारी रात्री 8 च्या सुमारास समान आणण्यासाठी जातो, असे लॉज मालकाला सांगून गेला. मात्र, परत आला नाही. त्यामुळे त्याच्यावर हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील आणि पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची दोन पथके फरार भूपेंद्र गिरीच्या मागावर रवाना झाली आहेत. जो पर्यंत फरार भूपेंद्र हाती लागत नाही तोपर्यंत ज्योती तोरडमल हिच्या मृत्यूचे गूढ उकलू शकत नाही. त्यामुळे पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला आहे.

हेही वाचा 

Back to top button