ठाणे: कळवा रुग्णालयात छताचा भाग कोसळून वॉर्डबॉय जखमी

ठाणे: कळवा रुग्णालयात छताचा भाग कोसळून वॉर्डबॉय जखमी

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात छताचा भाग कोसळून रुग्णालयातील वॉर्डबॉय जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री १.४५ च्या सुमारास घडली. सदानंद गोतारणे (वय २८) असे जखमी झालेल्या वॉर्डबॉयचे नाव आहे. त्याला आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघात विभागातील वार्डबॉय यांना कपडे बदलण्यासाठी व जेवणासाठी स्वतंत्र रूम नसल्याने त्यांना जिकडे जागा मिळेल, तिकडे जेवण करावे लागत आहे. त्यामुळे वार्ड मधील कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

रुग्णालयाची इमारत आता जुनी झाली असून वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय दुरुस्तीचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला आहे. मात्र ही कामे कधी होणार ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news