ठाणे : दिव्यात विद्युत वाहिनीचा स्फोट; दोघे जखमी | पुढारी

ठाणे : दिव्यात विद्युत वाहिनीचा स्फोट; दोघे जखमी

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : दिव्यात विद्युत वाहिनीचा भीषण स्फोट होऊन दोघे तरुण गंभीर जखमी झाले. सोमवारी रात्री ही घटना घडली.
जखमी झालेल्या दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दिवा पूर्वेच्या साबेगाव येथे पालिका शाळेच्या बाजूला असलेल्या विद्युत वाहिनीचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात सूरज गुरव (२१) आणि आशुतोष कुमार (२२) हे दोघे जखमी झाले. यामध्ये सूरज दहा टक्के भाजला असून आशुतोष याला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेनंतर विद्युत पुरवठा खंडित करून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे या भागाचा विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला होता.

हेही वाचा : 

Back to top button