ठाणे : पुढारी वृत्तसेवा केमिकल घेऊन जाणारा टँकर आज (शनिवार) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा बायपासवर पलटी झाला आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सदर टँकर मुंब्रा बायपास रोडवरून बाजूला असलेल्या नाल्यामध्ये पलटी होऊन अपघात झाला. टेक्नोवा कंपनीचे केमिकल एक्सपर्ट, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहनासह, मुंब्रा पोलीस कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहन, १ वॉटर टँकर व १ रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी पोचून तात्काळ बचावकार्य सुरु केले. यामध्ये वाहन चालक किरकोळ जखमी झाला आहे.
मुंब्रा-बायपास रोड, चर्नी पाडा, कौसा, ठाणे या ठिकाणी वन साईड ढाबा जवळ ठाण्याकडून मुंब्राकडे जाणाऱ्या वाहिनीवर टाटा टँकर एमएच ०४ इवाय ९१३४ हा टँकर मे. आरती फार्मा यांच्या मालकीचा असून, ब्रिजेश सरोळ असे चालकाचे नाव आहे. भोईसर ते जालना या मार्गाने हा टँकर चालला होता.
या टँकरमधून २५ टन सल्फ्युरिक ॲसिड हे केमिकल घेऊन जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सदर टँकर मुंब्रा बायपास रोडवरून बाजूला असलेल्या नाल्यामध्ये पलटी झाला. चालकाच्या डाव्या हाताला आणि कमरेला तसेच चेहऱ्याला दुखापत झाली आहे. सदरचा अपघात झाल्याने मुंब्रा- ठाणे रोडवरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. टँकर पलटी झाल्याने या ठिकाणी टँकर मधून केमिकलचा धूर व उग्र वास येत होता.
हेही वाचा :