G20 Summit Delhi : PM मोदींच्या टेबलावरील कंट्री प्लेटवरही ‘Bharat’; अध्यक्षीय भाषणात देशाची ओळखही ‘भारत’

G20 Summit Delhi : PM मोदींच्या टेबलावरील कंट्री प्लेटवरही ‘Bharat’; अध्यक्षीय भाषणात देशाची ओळखही ‘भारत’
Published on
Updated on

पुढीर ऑनलाइन डेस्क : G20 Summit Delhi : गेल्या काही काळापासून देशाचे नाव India बदलून Bharat असे करण्यात येणार आहे, अशा चर्चा सुर आहेत. नवी दिल्ली येथील भारत मंडपममधील G20 परिषदेत अध्यक्षीय भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची ओळख भारत या नावानेच करून दिली. तर मोदी यांच्या टेबलवरील कंट्री प्लेटवरही देशाचे नाव 'Bharat' असेच नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे इथून पुढे देशाचे नाव India बदलून Bharat असेच होणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाले, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळ तसेच समाज माध्यमात रंगू लागली आहे. तर सोशल मीडियावर Prime Minister Of Bharat हे ट्रेंडिंगवर आले आहे.

भारत पहिल्यांदाच G20 चे यजमानपद भूषवत आहे. देशाची राजधानी दिल्ली येथे आजपासून दोन दिवसीय G20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी G20 समूहातील सहभागी राष्ट्रांचे प्रतिनिधी, यूरोपीय संघाचे प्रतिनिधी आणि 9 पाहुणे राष्ट्रांचे प्रतिनिधी दिल्लीत कालपासून दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राष्ट्रांच्या प्रतिनिधींचे स्वागत केले आहे.

G20 Summit Delhi : या संदेशाने केली अध्यक्षीय भाषणाची सुरुवात…

या G20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षीय भाषणात देशाची ओळख 'भारत' या नावानेच करून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, G20 परिषदेत भारत सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. भारत भूमीने 2500 वर्षांपूर्वी एक संदेश दिला आहे तो म्हणजे मानवतेचं कल्याण आणि सूख हे कायम प्राथमिकता असायला पाहिजे. हा संदेश ज्या स्तंभावर कोरण्यात आला होता. तो स्तंभ या ठिकाणापासून काही किलोमीटर अंतरावर हा स्तंभ उभारण्यात आला आहे. भारत भूमीने समस्त विश्वाला 2500 वर्षांपूर्वी दिलेल्या या संदेशाची आठवण करून देत, G20 परिषदेला सुरुवात करूया, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

G20 Summit Delhi : आफ्रिकन युनियनला स्थायी सदस्यत्व ग्रहण करण्याचे निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आफ्रिकन युनियनला G20 राष्ट्रांमध्ये स्थायी सदस्यत्व देण्यात यावे, असा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला सर्व राष्ट्रांनी मान्यता दिली. त्यानंतर गॅवल वाजवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रस्तावाला सर्वांची संमती मिळाल्याचे जाहीर केले. तसेच प्रत्यक्ष कामकाजापूर्वी त्यांनी आफ्रिकन युनियच्या अध्यक्षांना स्थायी सदस्यत्व ग्रहण करण्याचे निमंत्रण दिले.

G20 Summit Delhi : मोरोक्को भूकंपातील मृतांना वाहिली श्रद्धांजली

G20 ची कार्यवाही सुरू करण्यापूर्वी, मी मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त करू इच्छितो. आम्ही सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. भारत मोरोक्कोच्या मदतीसाठी करण्यास तयार आहे. या कठीण काळात मोरोक्कोला सर्व शक्य मदत केली जाईल, असे म्हणाले. (G20 Summit Delhi)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news