मागाठाणे येथे तारामती चॅरीटेबल फाऊंडेशनचा दहिहंडी उत्सवानिमित्त आयाोजित कार्यक्रमात गाैतमीने नृत्य सादर केले. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. यावेळी चाहत्यांकडून गौतमीच्या नृत्याला तुफान प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमानंतर बाेलताना गाैतमी म्हणाली की, आज येथे लोकांचे प्रेम बघून फार छान वाटतय. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी माझ्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र, आज मुंबईतील लोकांचे प्रेम पाहिले खूप छान वाटले,
गाैतमीचे वडील काही दिवसांपूर्वी धुळ येथे बेवारस अवस्थेत सापडले हाेते. पुण्यातील बिबवेवाडी भागातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू हाेते. चार दिवसांपूर्वी उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला हाेता. गाैतमीचे आई आणि वडील काही वर्षांपासून विभक्त राहत होते. गौतमी तिच्या आईसोबत राहत होती.