ठाणे : निवृत्त भारतीय सैनिकाच्या पत्नीचा विनयभंग | पुढारी

ठाणे : निवृत्त भारतीय सैनिकाच्या पत्नीचा विनयभंग

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : एका निवृत्त भारतीय सैनिकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोणी ग्रामपंचायत सदस्य जयश्री ठोंबरे यांचे पती महेश रोहिदास ठोंबरे याच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र राजकीय दबावापोटी पोलिसांच्या आशीर्वादाने आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेनंतर डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. 

डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गोल्डन ड्रीम लोढा,तळोजा बायपास रोड सेक्टर १० मध्ये निवृत्त भारतीय जवानाच्या पत्नीचा विनयभंग करण्यात आला आहे. उद्योजकांकडून सोसायटीच्या हस्तांतरण संदर्भात शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीला महेश ठोंबरे हा देखील आला होता. या बैठकीदरम्यान महेश ठोंबरे याने बैठकीला आलेल्या महिलांना शिवीगाळ केली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसात ठाण्यात दोन महिलांनी तक्रार दाखल केली होती. या नंतर मानपाडा पोलिसांनी स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

आरोपी महेश ठोंबरे याचे सत्ताधारी पक्षातील नेत्यांसोबत चांगले संबंध असल्याने मानपाडा पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही. मात्र सुशिक्षितांच्या डोंबिवलीत भारतीय निवृत्त सैनिकाच्या महिलेचा विनयभंग झाल्याने सध्या एकच खळबळ उडाली आहे.त्यामुळे आता मानपाडा पोलीस आरोपी महेश ठोंबरे याला कधी अटक करणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे. 

.हेही वाचा 

अंतराळातून ‘असा’ दिसतो हिमालय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण

सूर्याकडे यान पाठवण्याचीही ‘इस्रो’ची जय्यत तयारी!

Back to top button