ठाणे : पालिकेच्या रुग्णालयाला आग | पुढारी

ठाणे : पालिकेच्या रुग्णालयाला आग

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिकेच्या कासारवडवली येथील रुग्णालयाला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. रुग्णालयातील तळमजल्यावरील मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली. रुग्णलयाच्या पहिल्या मजल्यावर प्रसूती विभाग असून या ठिकाणी तीन महिला आणि तीन बालके होती. मात्र, सुदैवाने या आगीत जीवीतहानी झाली नसून तीन महिला आणि तीन बालके बचावली आहे. बाळकूम अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन एका तासांत ही आग नियंत्रणात आणली.

कासारवडवली येथील रोजा गार्डेनिया या ठिकाणी ठाणे महापालिकेचे तीन माजली रुग्णालय आहे. यामध्ये तळ मजल्यावर ओपीडी असून मध्यरात्र असल्याने ओपीडीमध्ये एकही रुग्ण नव्हता. तर पहिल्या मजला हा प्रसूती विभाग असल्याने या विभागात तीन महिला आणि तीन बालके होती. तर तिसऱ्या मजल्यावर डायलेसिस विभाग असून रात्रीची वेळ असल्याने या तिसऱ्या मजल्यावरही एकही रुग्ण नव्हता. दीडच्या सुमारास तळ मजल्यावरील मीटर बॉक्सला आग लागल्यानंतर घटनास्थळी बाळकूम अग्नीशमन विभागाला पाचारण करण्यात आले.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे, महावितरणचे तसेच महापालिकेचे सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याच्या आधी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा बंद केल्यानंतर अवघ्या एका तासांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने पहिल्या मजल्यावर दाखल असलेले तीन महिला आणि बालके बचावल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

हेही वाचलंत का?

Back to top button