ठाणे: छताला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन घरांना आग; दाम्पत्यासह २ मुले गंभीर जखमी | पुढारी

ठाणे: छताला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन घरांना आग; दाम्पत्यासह २ मुले गंभीर जखमी

ठाणे: पुढारी वृत्तसेवा: छतावरून गेलेल्या विद्युत वाहिनीच्या तारेचा स्पर्श होऊन दोन घरांना आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील चार जण गंभीररीत्या जखमी झाले. ही घटना मुंब्रा येथील शिवाजीनगरातील झगडे चाळ येथे आज (दि.२२) दुपारी एकच्या सुमारास घडली. पती- पत्नीसह ४ आणि ५ वर्षांची दोन मुले जखमी झाली आहेत.

मुंब्रातील झगडे चाळ, शिवाजीनगर या ठिकाणी छतावरून टाटा पॉवरची विद्युत वाहिनी गेली आहे. त्यातील विद्युत तारेचा छताला स्पर्श होऊन दोन घरांना आग लागली. यावेळी दोन घरातील समान जाळून राख झाले. तर या आगीत एकाच कुटुंबातील चार जण गंभीररीत्या भाजून जखमी झाले आहेत.

आलिमुद्दिन सय्यद (वय 35), सलमा सय्यद (वय 30), फातिमा सय्यद (वय ४ ), आलिना सय्यद (वय 5) अशी जखमी झालेल्या चौघांची नावे आहेत. जखमी चौघांना मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी टोरंट पॉवर विद्युत कर्मचारी, मुंब्रा पोलीस, अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहनासह व एक रेस्क्यू वाहन दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग नियंत्रणात आणली आहे.

हेही वाचा 

Back to top button