ठाणे महापालिकेच्या बसला आग ; १५ प्रवासी सुखरूप | पुढारी

ठाणे महापालिकेच्या बसला आग ; १५ प्रवासी सुखरूप

ठाणे : पुढारी वृत्तसेवा शनिवारी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास खारेगाव तलावाजवळ, खारेगाव कळवा या ठिकाणी आलिमघरकडून ठाणे रेल्वे स्टेशनला जात असलेल्‍या ठाणे मनपा परिवहन सेवेच्या आनंद नगर आगारच्या बसला आग लागली. स्टार्टर मध्ये शॉर्टसर्किट होऊन बसला आग लागली. यावेळी प्रसंगावधान राखत बस मधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या बसमध्ये 15 प्रवासी प्रवास करीत होते.

आलिमघरकडून ठाणे रेल्वे स्टेशनला जात असलेली टीएमटी बस क्रमांक एमएच 04 केएफ 4042 या बसच्या स्टार्टरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. ही घटना आज (शनिवार) कळव्यातील खारेगाव येथे घडली. मात्र, वेळीच प्रवाशांनी बस बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला. या बस मध्ये 15 प्रवासी प्रवास करीत होते.

घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान फायर आणि रेस्क्यू वाहनासह हजर झाले. सदर घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. सदर घटनास्थळी बसला लागलेली आग बसमधील चालक, वाहक, स्थानिक रहिवाशी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने पूर्णपणे विझविण्यात आली.

हेही वाचा :  

Back to top button