ठाणे : ठाकरे गटाच्या स्मिता आंग्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

ठाणे : ठाकरे गटाच्या स्मिता आंग्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे-फडणवीस सरकार तसेच त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या संदर्भात समाजमाध्यमांवर टीका करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे सत्र ठाण्यात सुरु झाले आहे. ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या रोशनी शिंदे, रॅपर राज मुंगासे विरोधात गुन्हे दाखल झाल्याचे प्रकरण ताजे असताना शुक्रवारी (दि.७) ठाकरे गटाच्या स्मिता आंग्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अवघ्या काही तासांत ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

ठाण्यात रोशनी शिंदे यांच्या प्रकरणामुळे एकीकडे महाराष्ट्रातील वातारण तापले आहे. या मारहाणीचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने ठाण्यात मोर्चा देखील काढण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असताना आता माजी नगरसेविका नम्रता भोसले यांनी आपल्याला व्हॉट्सअॅपवर धमकावले असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कोपरी पाचपाखाडी विभागातील विधानसभा अधिकारी स्मिता आंग्रे यांनी गुरुवारी केला होता.

तर माजी नगरसेविका नम्रता भोसले यांनी देखील पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात फेसबुकवर आपली जाणीवपूर्वक बदनामी करून आपले चरित्रहनन करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला होता. त्यानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी भोसले यांनी पोलीस आयुक्तांकडे केली. दरम्यान भोसले यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत ठाणे पोलिसांनी शुक्रवारी ठाकरे गटाच्या स्मिता आंग्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिंदे गटाच्या माजी नगरसेवक नम्रता भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अवघ्या काही तासांत ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचा 

Back to top button