

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण गेल्या दोन वर्षापासून रखडले होते. २०२० व २०२१ या वर्षांच्या सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण येत्या १० एप्रिल रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत सांय. ६.३० वाजता होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतील.
२०२० – २०२१ च्या पुरस्काराचे मानकरी असे नाटक – कुमार सोहनी, गंगाराम गवाणकर, कंठसंगीत पंडितकुमार सुरूशे, कल्याण गायकवाड, उपशास्त्रीय संगीत – शौनक अभिषेकी, देवकी पंडित, चित्रपट मधु कांबीकर, वसंत इंगळे, कीर्तन – ज्ञानेश्वर वाबळे, गुरूबाबा औसेकर, शाहिरी अवधूत – विभुते, कै. कृष्णकांत जाधव, नृत्य – शुभदा वराडकर, , जयश्री राजगोपालन, कलादान अन्वर कुरेशी, देवेंद्र दोडके, – वाद्यसंगीत – सुभाष खरोटे, ओंकार गुलवडी, तमाशा – शिवाजी थोरात, सुरेश काळे, लोककला – सरला नांदुरेकर, कमलबाई शिंदे, अदिवासी गिरीजन मोहन मेश्राम, गणपत मसगे