पश्चिम बंगालचे कायदा मंत्री मलय घटक यांना ईडीची नोटीस; कोळसा तस्करी प्रकरणात होणार चौकशी | पुढारी

पश्चिम बंगालचे कायदा मंत्री मलय घटक यांना ईडीची नोटीस; कोळसा तस्करी प्रकरणात होणार चौकशी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय तपास यंत्रणा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगाल मधील कोळसा तस्करी प्रकरणात ममता बनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील कायदा मंत्री मलय घटक यांना नोटीस पाठवली आहे. २९ मार्चला दिल्लीतील ईडी मुख्यालयात त्यांना चौकशी करीता हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. उद्या, गुरूवारी घटक यांच्या खासगी सचिवाला ईडी कार्यालयात बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

घटक यांना ईमेलवर ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आसनसोल महानगर पालिकेतील अनेक नगरसेवक देखील याप्रकरणात ईडीच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. कोळसा तस्करी प्रकरणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतने अभिषेक बॅनर्जी तसेच त्यांच्या पत्नीची अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. मलय घटक कोळसा तस्करीचा मास्टरमाईंड अनूप मांझी उर्फ लाला यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे.

घटक हे कायदा मंत्री तसेच कोयलांचल क्षेत्रातील प्रभावशाली तृणमूल नेते आहेत. तस्करीचे थेट तार त्यांच्यापर्यंत पोहचले आहेत. यासंबंधी त्यांची यापूर्वी देखील चौकशी झाली आहे. त्यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या धाडी दरम्यान अनेक महत्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली होती. याच आधारावर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

हेही वाचा : 

Back to top button