ठाणे : नालेश्वर नगरात अवैध बांधकामांवर महसूलची कारवाईची मोहीम; स्‍थानिकांचा विरोध | पुढारी

ठाणे : नालेश्वर नगरात अवैध बांधकामांवर महसूलची कारवाईची मोहीम; स्‍थानिकांचा विरोध

ठाणे ; पुढारी वृत्‍तसेवा विरार फाट्याजवळील नालेश्वर नगर येथील शेकडोहून अधिक घरांवर आज (बुधवार) महसूल विभागने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. ज्यात हजारो जणांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे. त्‍यामुळे या कारवाईला स्थानिक रहिवाशांकडून जोरदार विरोध केला जात आहे.

स्वतःची घरे वाचविण्यासाठी येथील रहिवाशी रस्त्यावर उतरले आहेत. नालेश्वर नगर परिसरात सरकारी जागेवर गेल्या सहा वर्षात चाळीचे अवैध बांधकाम झाले आहे. ज्यात पाच ते सहा हजार लोकांची लोकवस्ती आहे. सहा वर्षांपूर्वी बिल्डरांनी जेंव्हा या चाळीचे बांधकाम केले व लोकवस्ती उभी केली तेव्हा शासनाने आम्हाला घरपट्टी, वीजमिटर दिले आहे. त्यानंतर आज सहा वर्षांनी महसूल विभाग या ठिकाणी का कारवाई करत आहे? असा संतप्त सवाल इथल्या नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

दरम्‍यान या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्यात आला आहे. स्‍थानिकांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. त्‍यामुळे या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण तयार झाले आहे.

हेही वाचा : 

Back to top button