

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाने 3 किलो कोकेनची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोन नायजेरियनांना अटक केली. अटक केलेल्या नायजेरियांनी ड्रग्ज आपल्या शरीरात लपवून ठेवले होते. दोघांना ३० कोटी रुपयांचे ड्रग्ज वाहून नेण्यासाठी २,००० डॉलरचा मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. लुई आणि व्हिक्टोरिया अशी अटक केलेल्या नायजेरियन आरोपींची नावे आहेत. या दोघांच्यावर नार्कोटिक ड्रग्स सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime)
माहितीनुसार लुई आणि व्हिक्टोरिया या नायजेरियनांना 3 किलो कोकेनची तस्करी करणाऱ्या महिलेने २,००० डॉलरचा मोबदला दिला होता. या दोघांना विशिष्ट गुप्तचरांच्या आधारे, डीआरआय अधिकाऱ्यांनी ३ मार्च रोजी अदिस अबाबाहून आलेल्या दोघांना रोखले. त्यांच्या सामानाची तपासणी केली असता काहीही निष्पन्न झाले नाही, परंतु माहिती अचूक असल्याने अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी सुरु केली. अधिकाऱ्याने सांगितले की त्यांच्यापैकी एकाला हेपेटायटीस बी आहे, तर दुसरा एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे.
चौकशीत लुई आणि व्हिक्टोरिया यांनी आपल्या शरीरात ड्रग्ज ठेवल्याचे कबूल केले. सोमवारी (दि.६) डॉक्टरांनी लुईच्या पोटातून ८४ आणि व्हिक्टोरियाच्या पोटातून ८७ गोळ्या काढल्या.
हेही वाचा