ठाणे : बेलापूरहून खारकोपर स्टेशनला जाणाऱ्या लोकल ट्रेनचे ३ डबे रूळावरून घसरले

लोकल ट्रेनचे डबे रूळावरून घसरले
लोकल ट्रेनचे डबे रूळावरून घसरले

ठाणे ; पुढारी वृत्‍तसेवा बेलापूरहून खारकोपर स्‍टेशनकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनचे ३ डबे खारकोपर स्‍टेशनमध्ये प्रवेश करताना रूळावरून घसरले. ही घटना आज (मंगळवार) सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांच्या सुमारास घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही इजा झालेली नाही. रिलीफ ट्रेन घटनास्‍थळी पोहचल्‍या असून, गाड्यांची वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुध्दपातळीवर सुरू आहे.

दरम्‍यान या अपघातामुळे बेलापूरहून खारकोपर दरम्‍यानची रेल्‍वेची वाहतूक ठप्प झालेली आहे. बेलापूर ते खारकोपर हा शहरातील सर्वात व्यस्‍त रेल्‍वेमार्ग आहे. त्‍यामुळे या मार्गावर या अपघाताचा परिणाम झालेला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news