Shiv Jayanti : राज्यातील 50 दृष्टीहीन युवक-युवतींची किल्ले शिवनेरीला भेट

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या दृष्टीहीन 50 युवक आणि युवतींना किल्ले शिवनेरीकडे रवाना करण्यात आले. या सर्व अंधांसाठी डोंबिवली शहर मध्यवर्ती शहर शाखेतर्फे एका बसने शिवरायांच्या जन्मस्थळ असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीला पाठविण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख राजेश मोरे, शहर सचिव संतोष चव्हाण, उपशहरप्रमुख गजानन व्यापारी, कार्यालय प्रमुख प्रकाश माने, शाखाप्रमुख वैभव राणे, धनाजी चौधरी, महिला सेनेच्या केतकी पोवार, उषा आचरेकर, रोहित जमादार, शैलेश चव्हाण, श्रीकांत उपाध्ये, उपकार्यालय प्रमुख सागर बापट, आदी मान्यवर पदाधिकारी, शिवसैनिकांसह डोंबिवलीतील शिवप्रेमी नागरिक दृष्टीहीन युवक-युवतींच्या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. (Shiv Jayanti)
Shiv Jayanti : दृष्टीहीन युवक-युवतींसाठी पर्वणी
महाराष्ट्र धर्म आणि हिंदवी स्वराज्याची शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 व्या जयंतीचे औचित्य साधून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेच्यावतीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या 18 ते 30 वयोगटातील 50 दृष्टीहीन युवक-युवतींसाठी ही पर्वणीच ठरली. सर्वांचे आकर्षण असलेल्या शिवछत्रपतींच्या जन्मोत्सवानिमित्त शिवनेरी किल्ल्यावर होणाऱ्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी शनिवारी रात्री 12 वाजता डोंबिवली शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेसमोर हे सर्व दृष्टीहीन 50 युवक-युवती एकत्रित जमले होते. शहर शाखेशेजारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला दृष्टीहीन युवक-युवतींच्यावतीने शहरप्रमुख राजेश मोरे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी शिवनेरी किल्ल्याकडे प्रस्थान केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला कार्यक्रमासाठी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, शहर समन्वयक जितेन पाटील यांच्यासह शिवभक्तांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा
- Somavati Amavasya 2023 : सोमवती अमावस्या रविवारी की सोमवारी, जाणून घ्या पूजा मुहूर्त व विधी
- कसबा पेठेत अटीतटीची लढत रंगणार; भाजपच्या बालेकिल्ल्याला ‘मविआ’ची धडक
- Nathan Lyon Wickets Century : भारताविरुद्ध वॉर्नला जे जमले नाही ते लायनने करून दाखवले!