गांधी परिवार नेहरू आडनाव लावायला का घाबरतोय?: अनुराग ठाकूर

गांधी परिवार नेहरू आडनाव लावायला का घाबरतोय?: अनुराग ठाकूर

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान मोदी यांनी कोणाचाही अपमान केलेला नाही. त्यांनी एक साधा सरळ प्रश्न गांधी घराण्याला विचारला आहे. गांधी परिवार पंडित नेहरू यांचे आडनाव लावायला का घाबरतोय? असा काय नाईलाज आहे की, ते नेहरूंचे आडनाव लावत नाहीत. यामध्ये राहुल गांधी यांना जर अपमान वाटत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांना या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागणार आहे, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. डोंबिवली येथे आज (दि.१४) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कल्याण लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ज्या ठिकाणी गैरव्यवहार असल्याचा संशय इन्कम टॅक्स विभागाला येतो. त्या ठिकाणी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई होते, असे बीबीसी कार्यालयावर टाकलेल्या इनकम टॅक्स कारवाईवर ते म्हणाले. त्या संस्थेने केलेल्या व्यवहाराचा पूर्ण अभ्यास करून आणि सर्व्हे करून इन्कम टॅक्स विभागाकडून माहिती प्रसारित केली जाते. ज्यावेळी त्यांची चौकशी पूर्ण होईल, त्यावेळी रिपोर्ट देण्यात येईल.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्ती जास्त जागा निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात महविकास आघाडी सरकारमुळे कामाची गती मंदावली होती. आता पुन्हा भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची सत्ता आल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा विकासाला गती मिळेल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news