डोंबिवली : जवानाकडून ‘आरपीएफ’ सबइन्स्पेक्टरची हत्या

डोंबिवली : जवानाकडून ‘आरपीएफ’ सबइन्स्पेक्टरची हत्या

डोंबिवली ;पुढारी वृत्तसेवा: आरपीएफच्या (Railway Protection Force) सब इन्स्पेक्टरची जवानाने हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व भागात घडली आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसवराज गर्ग असे हत्या झालेल्या सब इन्स्पेक्टरचे नाव असून, पंकज यादव असे आरोपीचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी पंकज यादव याची एका प्रकरणात चौकशी करून, त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईचा राग मनात धरून त्याने ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बसवराज गर्ग सब इन्स्पेक्टर पदावर कार्यरत होते. कल्याण पूर्वेकडील सिद्धार्थनगर येथील रेल्वेच्या बॅरेकमध्ये ते राहत होते. बुधवारी रात्री बसवराज आपल्या बॅरेकमध्ये मोबाईलवर गाणी ऐकत होते. त्या ठिकाणी जवान पंकज यादव आला. त्याने हातातील लाकडी दांडक्याने व ठोशा-बुक्क्यांनी बसवराज यांना मारहाण केली.  मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने बसवराज यांचा जागीच मृत्यू झाला.  पंकज यादव याने घटनास्‍थळावरुन पलयान केले.

कोळशेवाडी पोलीस ठाण्यात पंकज यादवविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिस त्‍याचा शोध घेत होते. पंकज पेण येथे लपून बसल्याची माहिती  पोलिसांना मिळाली. त्‍यांनी तात्काळ पेण गाठत अवघ्या सहा तासात पंकजला बेड्या ठोकल्या . दोन वर्षांपूर्वी आरपीएफ कार्यालयात पंकज याचे त्याच्या सहकार्यांशी वाद झाला होता. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाच्‍या चौकशीनंतर वरिष्ठांनी पंकजवर कारवाई केली होती. याचा राग पंकजच्या मनात होता. दोन वर्षापासून तो संधीच्या शोधात होता. अखेर बुधवारी त्याने बसवराज यांना गाठून त्यांची हत्या केली, असे पोलीस तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news