डोंबिवली : भरधाव दुचाकीची सायकलस्वारास धडक | पुढारी

डोंबिवली : भरधाव दुचाकीची सायकलस्वारास धडक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : भरधाव दुचाकीने धडक दिल्याने‎ सायकलस्वार जखमी झाला. ही घटना आज (दि.२) सकाळी  डोंबिवलीतील उष्मा पेट्रोल पंपाजवळ घडली. या अपघातात अंबरीश मुलगे (वय २६)  हा जखमी झाला. या‎ प्रकरणी दुचाकी चालक समीर माने याच्याविरुद्ध‎ मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

अंबरीश हा सकाळी मिलाप नगर येथून सायकलीने कामावर जात होता. उष्मा पेट्रोल पंप येथे पाठीमागून आलेल्या भरधाव दुचाकीने त्याला धडक दिली. यात अंबरीश आणि दुचाकी चालक समीर जखमी झाले. दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  अंबरीश याने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. समीर हा दारू पिऊन दुचाकी चालवत होता. असे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button