कल्याणमध्ये बिल्डरकडून रहिवाशांना मारहाण | पुढारी

कल्याणमध्ये बिल्डरकडून रहिवाशांना मारहाण

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण पूर्वमध्ये साई साक्षी इमारतीतील रहिवाशांना एका बिल्डरने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात रहिवाशांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

कल्याणमधील तिसगाव येथील साई साक्षी इमारतीतील रहिवाशांचा आणि बिल्डरचा इमारतीच्या वॉल कंपाऊंड वरून वाद सुरू आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास सोसायटी सदस्यांनी वॉल कंपाऊंड दुरुस्त करण्यासाठी माती आणून टाकली होती. याचवेळी सोसायटीचे सदस्य व संबंधित बिल्डरच्या साथीदारांमध्ये वाद झाला. या वादातून बिल्डरच्या काही साथीदारांनी सोसायटीत गोंधळ घालत काही रहिवाशांना मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी रहिवाशांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button