डोंबिवलीतील सामुहिक बलात्कार प्रकरणी ३३ आरोपी अटकेत | पुढारी

डोंबिवलीतील सामुहिक बलात्कार प्रकरणी ३३ आरोपी अटकेत

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

डोंबिवलीतील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार प्रकरणी मानपाडा पोलिसांनी फरार असलेल्या दोन आरोपींना सोमवारी सकाळी अटक करून गजाआड केले. पिडीत मुलीने पोलीस ठाण्यात एकूण ३३ आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला होता.

गुरुवारी २३ जणांना अटक केल्यानंतर इतर ६ आरोपींचा शोध घेण्यास शुक्रवार उजाडला. त्यानंतर रविवारी दोन आणि सोमवारी दोन जणांना मानपाडा पोलिसांनी अटक केली. त्यामुळे ३३ आरोपी गजाआड झाले असून २९ तारखेपर्यंत या सर्व आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

डोंबिवलीच्या ग्रामीण भागातील १५ वर्षीय मुलीवर तिच्या प्रियकराने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला होता.

या प्रकरणात तब्बल ३३ जणांनी नावे समोर आली होती. यातील २९ जणांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांत २ जण अल्पवयीन आहेत. आता ३३ च्या ३३ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

त्या पाच व्हिडिओ क्लिप महत्वाचा पुरावा

संशयितांनी पीडितेशी लैंगिक संबध ठेवतानाचे व्हिडिओ काढले असून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचे बोलले जात आहे.

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणातील संशयितांनी संबधित मुलीवर अत्याचार करून पाच व्हिडिओ क्लिप काढल्याचे समोर आले आहे. या पाचही क्लिप पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. या प्रकरणात हा सर्वात मोठा पुरावा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

काही आरोपींनी व्हिडिओ डिलिट केले आहेत. ते पुन्हा रिकव्हर करण्यासाठी जप्त मोबाइल फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत.

Back to top button