कल्याण : इंग्रजी शाळेने बंद केला सीआयई बोर्ड; विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात | पुढारी

कल्याण : इंग्रजी शाळेने बंद केला सीआयई बोर्ड; विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याणमधील एका शाळेने विद्यार्थी आणि पालकांसमोर एक वेगळेच संकट उभे केले आहे. विद्यार्थी सध्या सीआयई या बोर्डात शिकत असून अचानक शाळेने हा बोर्डच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता दुसऱ्या बोर्डचा अभ्यास करावा लागणार आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना झेपणार का ? असा प्रश्न उभा राहिला आहे. अचानक बोर्ड बंद केल्याने पालक वर्गामधून संताप व्यक्त केला जात आहे.

कल्याण पश्चिम येथील पोदार शाळेत आज (दि. १६) सकाळपासून शेकडो पालकांचा एकच गोंधळ सुरू होता. शाळेने अचानक केंब्रिज बोर्ड बंद केला आहे. त्याऐवजी सीबीएसी आणि आयसीएसी या दोन बोर्डमध्ये प्रवेश घ्यावे, असे आवाहन शाळेने केले आहे. यासाठी पालक नकार देत असून, विद्यार्थी अचानक अभ्यासक्रम बदलला तर अभ्यास कसा करणार ? या चिंतित आहेत. आज सकाळपासून शेकडो पालकांनी शाळेच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले.

इतकेच नव्हे, तर शाळेचे संस्थापक, संचालक, शिक्षक काहीच उत्तर देत नसल्याने पालकांची चिंता अधिक वाढली आहे. तर शाळेने गुरुवारी या संदर्भात पालकांची सभा ठेवली असल्याचे सांगितले. या सभेत पालक आणि संस्थेचे संस्थापक सहभागी होणार आहेत. त्यानंतर काय तो निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले जात आहे. तसेच सध्या शाळा नेहमी प्रमाणे सुरू राहणार असल्याचे शाळेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा :  

Back to top button