Missing girls
Missing girls Pudhari

Thane Minor Girls Missing: 2 दिवसांत 4 अल्पवयीन मुली बेपत्ता; ठाण्यात पालकांमध्ये भीतीचे वातावरण

2 दिवसांत 4 अल्पवयीन मुली बेपत्ता; ठाण्यात पालकांमध्ये भीतीचे वातावरण
Published on

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मुंब्रा, कळवा आणि कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार अल्पवयीन मुली या घरातून बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात पालकांनी दाखल केलेल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Missing girls
Shahapur Scholarship Pattern Thane: शहापूरचा शिष्यवृत्ती ‘पॅटर्न’ आता संपूर्ण ठाणे जिल्ह्यात; निकाल उंचावण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

बारावीचा पेपर असल्याने रात्री अभ्यास करीत असलेली 16 वर्षीय मुलगी ही झोपलेली असल्याचा समज करीत 12 फेब्रुवारी रोजी पालक कामावर गेले दरम्यान सकाळी 11 वाजता विचारणा केली असता 16 वर्षीय मुलगी घरात नसल्याची माहिती पालकांना मिळाली. पालकांनी शिक्षकांना विचारणा केल्यानंतर ति मुलगी पेपरला आली नसल्याचे सांगितल्यानंतर पालक इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज माजिवाडा, ठाणे येथे गेले पेपर सुटला तरी ती दिसुन आली नाही. त्यांनी नातेवाईकाकडे चौकशी करून कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुलगी घरातून बेपत्ता होण्याची घटना कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभार आळी येथे घडली.

Missing girls
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Thane: ठाण्यात उभारली जातेय रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीश पुतळ्याची भव्य प्रतिकृती

कळवा येथे इयत्ता 9 वीत शिकणारी 16 वर्षीय मुलगी हिने शाळा सोडली. ती घरीच राहत होती. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार उठल्यानंतर मुलगी दिसून आली नाही तिचा शोध घेतल्यानंतर अखेर कळवा पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Missing girls
Naik Shinde dispute Thane: नाईक-शिंदे वादातून ठाण्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

मुंब्र्यातील घटनांनी पालक धास्तावले

मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना 14 फेब्रुवारी रोजी घडल्या आहेत यात दिवा पूर्व येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीला 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ती सतत मोबाईलवर बोलत असल्याने तिच्या आईने तिचा फोन तपासून किरकोळ रागावले. त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता त्या मुलीने घरात राहायचे नसल्याचे सांगून घराबाहेर पडली व त्यानंतर ती परत आली नाही. तर, दुसऱ्या घटनेत, मुंब्र्यातील 16 वर्षे मुलगी 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मैत्रिणीला भेटून घरी परतली होती. रात्री सुमारे 9.30 वाजता रागाच्या भरात ती घराबाहेर जात असल्याचे सांगून मोबाईल घेऊन बाहेर पडली. मात्र त्यानंतर ती परत आली नाही. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news