ठाणे : रामदेव बाबांविरोधात महिला काँग्रेसचे आंदोलन

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात. आणि माझ्या नजरेने काही नाही घातले, तरीही छानच दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्याविरोधात राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आज (दि.२६) सकाळी ठाणे महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत रामदेव बाबा यांचा निषेध केला. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून घोषणबाजी केली.
ठाण्यातील हायलँड मैदानात योग विज्ञान शिबिर आणि महिला संमेलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या समक्ष रामदेव बाबा यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानाचे संतप्त पडसाद उमटले असून, विविध राजकीय पक्ष व महिला संघटनांनी रामदेव बाबा यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील यांनी रामदेव बाबा यांना पुण्यात आल्यास तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचलंत का ?
- महिलांनी काही घातले नाही तरी त्या सुंदर दिसतात, योगगुरू रामदेव बाबांचे आक्षेपार्ह वक्तव्य
- Patanjali : ‘मला’ आणि पतंजलीला बदनाम करण्यासाठी मोठे षडयंत्र – रामदेव बाबा
- Shraddha DNA Test : जंगलात सापडलेले अवयव श्रद्धाचेच : अवयवाचे DNA वडिलांच्या DNA शी जुळले