

कराड; पुढारी वृत्तसेवा : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथे आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चव्हाण साहेबांना अभिवादन केले. या नंतर पुढे जाताना त्यांच्या गाड्यांचा ताफा अचानक कराड कन्या शाळेसमोर थांबला.
यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी अनेक नागरिक उभे होते. अनेक विद्यार्थी उभे होते. यावेळी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी थांबली. यासोबतच त्यांच्या गाड्यांचा ताफाही थांबला. मुख्यमंत्री शिंदे हे गाडीतून खाली उतरले. यावेळी कार्यकर्ते आणि चाहत्यांनी त्यांच्या भोवती गराडा घातला. मात्र मुख्यमंत्री शिंदे हे विद्यार्थी थांबलेल्या ठिकाणी गेले.
येथे त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिवादन स्विकारले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक अशा प्रकारे भेट दिल्याने विद्यार्थीही भारावून गेले. मुख्यमंत्रीही काहीवेळ विद्यार्थ्यांमध्ये रमले. त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत फोटो काढले. त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी अचानक घेतलेल्या या पवित्र्यामुळे सुरक्षारक्षकांची गडबड उडाली.
हेही वाचा :