कळव्यामध्ये 38 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा!

पोषण आहारातील मटकीची आमटी खाऊन मुलांना उलट्या आणि जुलाब
Food poising In Kalva
पोषण आहारामुळे विषबाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले विद्यार्थीPudhari Photo
Published on
Updated on

ठाणे : कळव्यातील सहकार विद्यालय या खासगी शाळेतील पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी (दि.1) दुपारी घडला आहे. दुपारच्या जेवणात मटकीची आमटी आणि भात खाल्यानंतर मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. त्यानंतर या सर्व मुलांना तातडीने ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय कधीक्षक डॉ. अनिरुध्द मळगावकर यांनी दिली आहे.

Food poising In Kalva
जळगाव : शिवरे येथील विद्यार्थ्यांना गणेशोत्सव कार्यक्रमात महाप्रसाद खाल्यानंतर विषबाधा

शासनाकडून सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून शालेय पोषण आहार दिला जातो. या शालेय पोषण आहारात मुखत्वे करून खिचडी दिली जाते. कळवा येथील सहकार विद्यालयात दुपारच्या जेवणात या विद्यार्थ्यांना आहारात मटकीची आमटी आणि भात देण्यात आला होता. मात्र मटकीला वास येतं असल्याच्या तक्रारी मुलांनी केल्या. ही आमटी आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्याचा त्रास सुरु झाला. त्यानंतर शाळेतून कळवा रुग्णालयाला माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने रुग्णवहिका पाठवून 38 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले.

मुलांना भेटू न दिल्याने पालक संतप्त...

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलांना भेटू न दिल्याने पालक संतप्त झाले होते.वॉर्डच्या बाहेरच सर्व पालकांना थांबवण्यात आल्याने पालक वॉर्ड मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे सुरक्षारक्षक आणि पालकांमध्ये खटके उडाले.

Food poising In Kalva
नांदेड : कंधार येथील आश्रमाशाळेतील १३ विद्यार्थ्यांना विषबाधा
आम्हाला सायंकाळी 5 च्या दरम्यान सहकार विद्यालयातून फोन आला की, शाळेतील मुलांना उलट्या, पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास होत आहे. त्यानंतर आम्ही रुग्णवाहिका पाठवून मुलांना कळवा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर 10 मिनिटात उपचार सुरु केले. सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून त्यांना 24 तास निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
- डॉ अनिरुध्द मळगावकर, वैद्यकीय अधीक्षक, कळवा रुग्णालय
मी कामावर होतो, माझ्या मुलीने दुसऱ्याच्या फोन वरून मला रडत रडत कळवलं, ही शाळेची जबाबदारी होती आधी शाळेने अन्न तपासायला हवं होत, शाळेत टिफिन आणू नका असं शाळेतून सांगितलं असल्याने आम्ही मुलांना टिफिन देत नाही म्हणून त्यांना शाळेतून आहार घ्यावा लागतो.
- मंगेश कांबळे, पालक.
Food poising In Kalva
धक्‍कादायक! जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्‍किटातून विषबाधा
मी खिचडी खाल्ली नाही म्हणून मी बचावली, ज्यांनी खिचडी खाल्ली त्यांना पोटदुखी सुरु झाली, उलट्या सुरु झाल्या नंतर शिक्षकांनी सर्वांना रुग्णालयात आणलं.
- तनिष्का फासे, विद्यार्थिनी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news