धक्‍कादायक! जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्‍किटातून विषबाधा

केकत जळगावमधील जि.प. शाळेतील घटना
G.P. School students poisoned by biscuits
धक्‍कादायक! जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्‍किटातून विषबाधाPudhari Photo
Published on
Updated on

पैठण : पुढारी वृत्तसेवा

पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 40 ते 50 विद्यार्थ्यांना शिक्षकाने वाटप केलेल्या बिस्किटामधून विषबाधा झाल्याची घटना आज (शनिवार) सकाळी घडली आहे. त्‍यामुळे या परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सदरील विद्यार्थ्यांवर पाचोड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज सकाळी नेहमीप्रमाणे केकत जळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रार्थना पूर्ण झाल्यावर मुख्याध्यापक भगवान फुंदे यांच्यासह अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप केले. बिस्किट खाल्ल्यावर विद्यार्थ्यांना मळमळ व उलट्या होण्याचा त्रास होत असल्याचा प्रकार सुरू झाला. त्‍यामुळे तात्काळ या विद्यार्थ्यांना पाचोड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्‍यान या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. मागील आठवड्यात तालुक्यातील वडजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खिचडीतून विषबाधा होण्याची घटना घडली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news