ठाणे: अनधिकृत इमारती निष्कासित करण्याचा महापालिका आयुक्तांचे आदेश | पुढारी

ठाणे: अनधिकृत इमारती निष्कासित करण्याचा महापालिका आयुक्तांचे आदेश

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : कल्याण येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे रेरा परवानगी मिळवणाऱ्या सबंधित बिल्डरांभोवती ईडी, एसआयटी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यानंतर महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना या इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान रेरा घोटाळ्याप्रकरणी 8 बँक खाती व 16 संगणक जप्त करण्यात आले आहेत. तर प्रभाग अधिकाऱ्यांनी या इमारती निष्कासित केल्या नाही, तर अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल असे थेट आदेशच आयुक्तांनी दिले आहेत.

बनावट कागदपत्र प्रकरणात तहसीलदार, रजिस्ट्रेशन कार्यालय आणि केडीएमसी आयुक्तांना एसआयटीने पत्र व्यवहार केला. सर्व प्रकारची पुढील प्रक्रिया थांबवण्याची सूचना केली होती. तसेच इतर सरकारी जागेवर किती ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भातही माहिती मागितली होती. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात केडीएमसी अधिकाऱ्यांच्या खोटी सही आणि शिक्के वापरत अनेक बिल्डरांनी इमारतीच्या परवानग्या मिळविल्या होत्या. इतकेच नाहीतर त्याच परवागीच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र घेतले.

वास्तू विशारद संदीप पाटील यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. या प्रकरणात डोंबिवलीत एकूण 65 बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, याचा तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आला आहे. ईडीनं देखील या प्रकरणाची माहिती संबंधित विभागांकडून मागितली आहे. आता या प्रकरणी केडीएमसीच्या आयुक्तांनी मोठे पाऊल उचलले आहे.

दरम्‍यान, यापूर्वी खोट्या कागदपत्रंचा वापर करणाऱ्या 40 बिल्डरांची बँक खाती बंद करण्यात आली. खोट्या कागदपत्रांच्या आधारे ज्या जमिनींचे व्यवहार झाले आहेत त्या संदर्भात तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करण्यात आला आहे. या बिल्डरांनी ज्या ग्राहकानी घरे विकली आहेत. त्या नागरीकांची फसवणूक होऊ नये, यासाठी रजिस्ट्रेशन कार्यालयास सूचित करण्यात आले आहे.

नियमित आणि अनियमित इमारतीसंदर्भात केडीएमसी आयुक्तांकडे माहिती मागितली होती. सरकारी आरक्षित जागेवर काय परिस्थिती आहे. याचा आढावा देखील एसआयटीकडून घेतला जात आहे.  त्याच धर्तीवर केडीएमसी आयुक्तांनी कारवाईचे आदेश पारित केले आहेत.

हेही वाचा

ठाणे: माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश; शिंदे गटाला धक्का

नागपूर: बेपत्ता बाळाचा पोलिसांनी लावला ५ तासांत छडा 

असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार करणार्‍या दोन्ही आरोपींचा जामीन रद्द

Back to top button