डोंबिवली : शहाड पुलावरील महिलेच्या मृत्युप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा | पुढारी

डोंबिवली : शहाड पुलावरील महिलेच्या मृत्युप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : कल्याण-मुरबाड रोडवरील शहाडच्या रेल्वे उड्डाण पुलावर दुचाकीने जात असताना भरधाव वेगाने आलेल्या टँकरने स्कूटरला जोरात धडक दिली. या अपघातात कल्याण येथील म्हारळ गावातील कविता प्रशांत म्हात्रे (वय 38) ही महिला रस्त्यावर पडली आणि टँकर खाली चिरडून जागीच ठार झाली. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, टँकरच्या बेजबाबदार चालक सितासरण सुदप्रसाद मिश्रा रा. रांजनोली याच्याविरुध्द महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात मृत कविताचे पती प्रशांत म्हात्रे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बेजबाबदार टँकरचालक सितासरण मिश्रा याच्याविरुध्द गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. त्याच्या ताब्यातील टँकर जप्त करण्यात आला. याचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा

औरंगाबादेत रोबोटच्या हस्‍ते गणरायाची आरती अन् प्रसादाचेही वाटप  

बीडचे शशिकांत कुलथे, सोमनाथ वाळके यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान 

जळगाव : १५ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

Back to top button