बीडचे शशिकांत कुलथे, सोमनाथ वाळके यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

बीडचे शशिकांत कुलथे, सोमनाथ वाळके यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

बीड, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करून सोमनाथ वाळके व शशिकांत कुलथे यांचा सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीत गौरव करण्यात आला.

आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्‍वरी येथील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक वाळके यांनी कौशल्याधारित शिक्षणावर भर दिला आहे. विविध साधनांच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. याबरोबरच गेवराई तालुक्यातील दामुनाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कुलथे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांचे स्थलांतर थांबवत त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली. यासाठी कुलथे
हे या भागात बोलली जाणारी गोरमाटी भाषाही शिकले. या दोन्ही शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना नुकताच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. शिक्षक दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दरम्यान, केंद्र सरकारने 'पंतप्रधान स्कूल फॉर रायझिंग इंडिया (पीएम-एसएचआरआय) योजनेअंतर्गत देशभरातील 14 हजार 500 शाळा अद्ययावत आणि विकसित करण्याची योजना जाहीर केली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर या योजनेची घोषणा केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news