

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील श्रीनगर पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशनमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (दि.१६) दुपारी घडली. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. घरगुती वादातून ही घटना घडल्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्राथमिक माहिती दिली.
अनिता भीमराव व्हावळ (वय 34) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीसाचं नाव आहे. त्या ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात महिला पोलीस नाईक पदावर कार्यरत होत्या. 2008 च्या बॅचच्या महिला पोलीस कर्मचारी होत्या.
मंगळवारी दीड वाजताच्या सुमारास पोलीस स्थानकातील महिला पोलीस कर्मचारी यांनी अनिता यांना गळफास घेतल्याचे पाहिले. अनिता व्हावळ यांच्या मागे दोन मुली, पती असा परिवार आहे. या घटनेबाबत श्रीनगर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा