

कसारा; पुढारी वृत्तसेवा : आटगाव रेल्वे स्थानकाजवळ भागलपूर एक्सप्रेसची कपलिंग तुटल्याने आज सकाळी वाहतूक ठप्प झाली होती. कसारा येथील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर भागलपूर एक्सप्रेस दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी कसाऱ्याकडे रवाना झाली. रेल्वपासून वेगळे झालेले तीन डब्बे रुळावरून खाली न घसरल्याने मोठा अनर्थ टळला.
आज सकाळी साडेनऊ वाजता आसनगाव-आटगाव दरम्यान मालगाडी बंद पडल्याने कसाऱ्याकडे येणारी रेल्वे वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. ११ वाजता मालगाडी दुरुस्त झाल्यनंतर वाहतूक सुरु झाली. मात्र त्यानंतर अवघ्या १० मिनटात कसारा कडे निघालेल्या भागलपूर एक्सप्रेसचे आटगाव स्टेशन जवळ इंजिन पासून तिसऱ्या बोगीचे कपलिंग तुटून एक्सप्रेसचे काही डबे वेगळे झाले. याबाबत माहिती मिळताच कसारा येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कर्मचाऱ्यांनी कपलिंग जोडल्यानंतर रेल्वे दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी कसाऱ्याकडे रवाना झाली.
हेही वाचा :