ठाणे : पाण्याची टाकी फुटून २१ घरांची पडझड; वृद्ध महिला जखमी | पुढारी

ठाणे : पाण्याची टाकी फुटून २१ घरांची पडझड; वृद्ध महिला जखमी

 

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

ठाणे; पुढारी वृत्तसेवा: ठाणे महानगरपालिकेची ७५ हजार लिटर पिण्याच्या पाण्याची रिनोटँक टाकी फुटल्याची घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास समोर आली. या दुर्घटनेत २१ घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ६ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर ७५ वर्षीय तानुबाई श्रवण मुठे या आजीबाई जखमी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

वागळे इस्टेट, रोड क्रमांक ३३, रुपादेवी देवी टेकडी, रूपादेवी पाडा, महालक्ष्मी मंदिरजवळ, ख्रिश्चन कब्रिस्तानसमोर असलेली २००९ साली बांधण्यात आलेली ऑस्ट्रेलियन बनावटीची ठाणे महानगरपालिकेची ७५ हजार लिटर पिण्याच्या पाण्याची टाकी होती. ही टाकी शनिवारी (दि. २३) रोजी सकाळी फुटून टाकीतील पाणी जवळच असलेल्या झोपडपट्टीतील घरावर मोठ्या प्रेशरने गेले. यानंतर टाकी फुटून झोपडपट्टीतील घरांच्या भिंती व छप्पर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली.

या माहितीच्या आधारे घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, एनडीआरएफ (NDRF) चे अधिकारी व जवान, वागळे पोलीस कर्मचारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता (पाणी पुरवठा विभाग, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती) यांच्यासह स्थानिक माजी नगरसेवकांनी धाव घेतली.

या दुर्घटनेत तानुबाई मुठे याचा उजव्या पायासह उजव्या हाताला व कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने लोकमान्य नगर येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर घटनास्थळी ६ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. व इतर १५ घरांचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.

हेही वाचलंत का? 

Back to top button