नेवाळी (ठाणे) : पुढारी वृत्तसेवा : कचरा, पाणी, बंद पथदिव्यांमुळे कल्याण शहरातील नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यातच आता एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच आता अंत्यसंस्कार देखील वाहनांच्या प्रकाशात करावे लागत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हे चित्र एखाद्या खेड्यापाड्यातील नाही तर स्मार्ट सिटी म्हणून विकसित केल्या जाणा-या कल्याण परिसरातील आहे.