ठाणे : माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांना अटक | पुढारी

ठाणे : माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांना अटक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तीन जणांना कोळसेवाडी पोलीसांनी अटक केली आहे. कल्याणचे शिवसेना उपशहरप्रमुख तथा गौतम सोनवणे, अंबादास कांबळे आणि दिपक साळवे अशी अटक केलेल्या तिघा आरोपीची नावे आहेत.

कल्याण पुना लिंक रोड येथे बुधवारी सकाळी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे हे कामानिमित्त जात असताना त्यांच्यावर गौतम, अंबादास आणि दिपक यांनी रॉड आणि शस्त्राने जीवघेणा हल्ला करून पळून गेले होते. यात पालांडे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शिवसैनिकांनी पोलिसांना चांगले धारेवर धरून आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी लावून धरली होती. अखेर पोलिसांनी तपास करून उपरोक्त तीन आरोपींना बेड्या ठोकल्या. या प्रकरणी अधिक तपास करीत असल्याचे कोळसेवाडी पोलिसांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button