नगर : राशीन-गाडेवाडी रस्त्याच्या खडीकरण कामाचे उद्घाटन | पुढारी

नगर : राशीन-गाडेवाडी रस्त्याच्या खडीकरण कामाचे उद्घाटन

राशीन, पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील काळेवाडी ग्रामपंचायतअंतर्गत वेताळवस्ती येथे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या विकास निधीतून राशीन-गाडेवस्ती रस्त्याच्या खडीकरण कामाचा प्रारंभ काळेवाडीच्या सरपंच पुष्पा रायचंद काळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी काळेवाडीचे सदस्य संतोष गाडे, भाजपचे पदाधिकारी दत्तात्रय गोसावी, भाजपचे तालुका उपाध्यक्ष पांडुरंग भंडारे, भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शोएब काझी, भाजपचे राशीन शहराध्यक्ष बापूराव धोंडे, जयदीप शिंदे, माजी सर्कल अधिकारी आबासाहेब घोडके, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय काळे, ज्योतीराम काळे, दादा जाधव, नारायण साखरे, अप्पा काळे, राजेंद्र काळे, सतीश घोडके आदी उपस्थित होते.

गाडेवाडी रस्त्याच्या कामामुळे शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांना याचा फायदा होणार आहे. त्यांचाबरेच दिवसाचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Back to top button